रमजान ईद निमित्त दिल्या मुस्लिम बांधवाना शुभेच्छा
शबनम न्युज | शिरूर
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील अशी लढत रंगतदार होत आहे. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या वतीने प्रचार सुरू आहे.
आज मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या रमजान ईद च्या निमित्ताने शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचे चिरंजीव अपूर्व शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघात मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या शुभेच्छा देताना अपूर्व आढळराव पाटील यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, शिरूर लोकसभेचा खरा नायक म्हणजेच शिवाजी आढळराव पाटील यांना निवडून द्यावे. शिरूर लोकसभेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नसल्याचेही यावेळी अपूर्व शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे उपनेते इरफान भाई सय्यद तसेच भारतीय जनता पार्टीचे पुणे उपाध्यक्ष किसन बावकर, युवासेना संपर्कप्रमुख संकेत चावरे व भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक उत्तम केंदळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
भोसरी विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी घेत अपूर्व शिवाजी आढळराव पाटील यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.