शबनम न्युज | वाघोली
शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काल उमंग प्रायमो सोसायटीला भेट देऊन तेथील रहिवासी यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच वाघोली महानगरपालिका हद्दीत असूनही अपेक्षित अशी कामे न झाल्याची स्थानिकांनी तक्रार केली. शिवाजीराव आढळराव यांनी वाघोलीतील समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रहिवासीयांना दिले.
यावेळी विधानसभा संयोजक शिरुर हवेली प्रदिपदादा कंद, अध्यक्ष हवेली तालुका भाजप संग्राम गावडे, उपाध्यक्ष भाजपा पुणे दादासाहेब सातव, युवा जिल्हा प्रमुख पुणे गणेश सातव पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप आबा सातव, युवा सेना शहर प्रमुख वाघोली यश सातव, युवा सेना मंगेश सातव, प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा भाजप दादासाहेब सातव, उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी उमेश उंद्रे, पुणे जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस योगिता सातव, सोशल मीडिया अध्यक्ष अश्विनी पांडे, जिल्हा सचिव भाजप मोहन अण्णा शिंदे, महिला मोर्चा वाघोली अध्यक्ष विद्या पाटील, युवा मोर्चा पुणे जिल्हा उत्तर अध्यक्ष संदीप सातव, सरचिटणीस हवेली विजय जाचक, माजी उपसरपंच शांताराम बापू कटके, युवा सेना जिल्हा संघटक गणेश मस्के, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा गणेश सातव, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, माजी पंचायत समिती सदस्य श्याम गावडे, वाहतुक सेना राजेंद्र तांबे, उमंग प्रायमो चेअरमन किशोर दरवले, आय. व्ही. अपार्टमेंट चेअरमन भागवत सावडे, आय. व्ही. निया चेअरमन अनिल अनेघावे आदि उपस्थित होते.