शबनम न्युज / पिंपरी
रुपीनगर व ताम्हणेवस्ती भागात विजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे काल सायंकाळ पासुन 500 घराचा विज पुरवठा 20 तासापासून बंद होता. या विरोधात जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, शहरप्रमुख सचिन भोसले ,विधानसभा प्रमुख धनंजय भाऊ आल्हाट, जिल्हा सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख नितिन बोंडे ,शाखाप्रमुख प्रवीण पाटील ,सहदेव चव्हाण, युवसेना उपविधानसभा अधिकारी सुनिल समगिर,युवासेना विधानसभा चिटणीसअमित शिंदे जेष्ठ शिवसैनिक रमेश पाटोळे यांनी भोसरी डिव्हिजन ऑफिस मध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कार्यकारी अभियंता गवारे साहेब, अती. कार्यकारी अभियंता चौधरी साहेब,सहाय्यक अभियंता हुलसुलकर साहेब यांनी अधीक्षक अभियंतातगदपल्लीवर साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून 150 मिटर नवीन केबल दिल्यानंतर शिवसेना शिष्टमंडळाच्या मागणीस यश आले. व आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलन दरम्यान प्रशासकीय अधिकारी यांनी सहकार्य केल्यामुळे शिवसेना शाखा रुपीनगर यांनी प्रशासनाचे आभार मानले.