शबनम न्यूज / पिंपरी
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत पीठ सन 2021 – 2022 शैक्षणिक वर्षाकरिता शालेय पूर्व प्राथमिक वर्ग नर्सरी, जूनियर केजी, व सिनियर केजी, सीबीएससी प्रवेश सुरू करण्यात येत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग कार्यालय वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित टाळगाव, चिखली येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ कामकाज सद्यस्थितीमध्ये सुरू आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ सन 2021 – 2022 या शैक्षणिक वर्षाकरिता नर्सरी, जूनियर केजी, सिनियर केजी या वर्षाकरिता शालेय प्रवेश फॉर्म वाटपाचे काम दि. 16 जुलै 2021 ते 19 जुलै 2021 या कालावधी मध्ये सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये सुरू करण्यात येत आहेत.
शालेय प्रवेशासाठी चा फॉर्म हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ पाटील नगर, बगवस्ती, टाळगाव, चिखली येथील शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शालेय प्रवेश फार्म ची स्वीकृती दि. 20 जुलै 2021 पर्यंत जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, टाळगाव चिखली येथील शाळेमध्ये होणार आहे.
प्राप्त प्रवेश अर्जांची दिनांक 22 जुलै 2021रोजी सकाळी 11 वाजता लॉटरी पद्धतीने सोडत करण्यात येऊन विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देणे कामी कार्यवाही करण्यात येणार आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग कार्यालय, संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली अध्यक्ष राजेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.