शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी । प्रतिनिधी
वाईन शॉप मध्ये दारू घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी वाईन शॉप मालकाने चार दिवसांपूर्वी फिर्याद दिली होती. त्याच्या परस्पर विरोधात ग्राहकांच्या बाजूने देखील फिर्याद नोंदविण्यात आली.
Advertisement
बडेलाल राम मनोहर यादव (वय 70 रा.नढेनगर काळेवाडी) यांनी शनिवारी दिनांक 23 पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पिंपरी येथील रिगल वाईन शॉप च्या मालकाचा मुलगा आणि त्याचे दोन ते तीन कामगार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाच्या डोक्यात रोडने लाथ्या बुक्यांनी मारून जखमी केले. असे फिर्यादीत नमूद केलेले आहे. दरम्यान, यापूर्वी वाईन शॉप मालक कीर्ती लक्ष्मण राजपूत (वय 28 रा. पिंपरी) यांनी 19 ऑक्टोबरला फिर्याद दिली.
Advertisement