शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी । प्रतिनिधी
हॉटेलमध्ये तोडफोड करून भाजी कापण्याचा चाकू ने मारून जखमी केले. तसेच हॉटेलच्या काऊंटर मधून 3540 रुपये काढून जबरदस्तीने चोरून नेले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
Advertisement
दिघी जकात नाका येथे शनिवार दिनांक 23 रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. रोहन रमेश दरेकर (वय 23 रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) रोहन संजय माने (वय 19 रा. डोळस वस्ती)असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. संदीप शिवाजी अमृले (वय 19 रा. दिघी) यांनी या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
Advertisement