गोल्ड व्हॅल्युअर्सच्या फी चे योग्य व्हॅल्युएशन व्हावे
शबनम न्युज | पुणे
गोल्ड व्हॅल्यूअर हा महत्वाचा घटक ग्राहक व बँका यांचे दरम्यान काम करत असतो. व्हॅल्यूअर हा ग्राहकाच्या सोन्याचे योग्य मुल्यांकन करून देत असतो व त्याच्या मूल्यांकनाच्या जबाबदारीवर बँका व तत्सम संस्था या सोने तारण कर्ज देत असतात. परंतु, गोल्ड व्हॅल्यूअर ला त्याच्या जबाबदारी व कामाच्या तुलनेत योग्य ती फी तर मिळतच नाहीं ,पण इतर अनेक व्यावसायिक समस्यांना तोंड द्यावे लागते. बँकांना, तत्सम संस्थांना योग्य ते व्हॅल्यूअशन करून मिळाले पाहिजे आणि त्याच बरोबर ग्राहकांना पण समाधानकारक सेवा देताना व्हॅल्यूअरला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी शनीवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
बनावट सोने, बनावट दागिने सादर करून तारण कर्ज घेण्यासाठी ग्राहक आल्यास बँकांनी बनावट सोने जप्त करण्याची कारवाई करावी, त्याबाबत जनजागृती केली जावी, अशी मागणी देखील पत्रकार परिषदेत करण्यात आली.
गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ( महाराष्ट्र )च्या वतीने पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे शनीवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली .
यावेळी गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन ( महाराष्ट्र )चे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, प्रशासकीय सचिव सतीश पितळे, खजिनदार दीपक देवरूखकर, उपखजिनदार कालिदास कांदळगावकर, पुणे जिल्हाध्यक्ष दामोदर खरोटे व पुणे शहर प्रमुख सत्यनारायण वर्मा उपस्थित होते
व्हॅल्यूअरना त्याप्रमाणात मोबदला मिळत नाही, त्यासाठी चार्टर ऑफ डिमांड बनविला असून तो बँकांना पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
संस्थेने रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांना निवेदन देवून बनावट सोने अथवा सोन्याचे दागिने व्हॅल्यूअरने पकडल्यास ज्याप्रमाणे बँका बनावट नोटा जप्त करतात. त्याप्रमाणे ते जप्त करावेत म्हणून निवेदन दिले आहे. त्याचा पाठपुरावा चालू आहे. नुकतेच संस्थेने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना भेटून त्यांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, अगदी गाव पातळीवरील सुवर्णकार व सराफ जे व्हॅल्यूअर म्हणून काम करतात त्यांना ह्या असोसिएशन मार्फत न्याय मिळवून देण्याचा मानस तर आहे. त्याच बरोबर व्हॅल्यूअरना व्हॅल्यूअशन क्षेत्रातील प्रचलित बाबीं बाबत अवगत केले जाणार असून व्हॅल्यूअरना आपले कौशल्य अपडेट करण्यास मदत केली जाणार आहे.
आज बँका अथवा तत्सम संस्था ह्या सोने तारण कर्जयोजनेतून नफा कमावत असतात परंतु ह्यातील महत्वाचा घटक व्हॅल्यूअरला त्याच्या वरील जोखमीच्या तुलनेत योग्य फी मिळावी, आपले कौशल्य अध्द्य्यावत ठेवण्यास त्याला मदत करणे त्यासाठी जिल्हा पातळीवर कार्यशाळा भरवणे, व्हॅल्यूअरला आपल्या क्षेत्रातील नवनवीन सुधारणांची माहिती देणे, बनावट सोने व सोन्याच्या दागिने ओळखण्यासाठी घ्यावयाच्या काळजी बद्धल माहिती देणे, कायदेशीर बाबीं बद्धल माहिती करून देत असताना महाराष्ट्रातील गावोगावी असलेल्या तमाम व्हॅल्युअर्सना न्याय मिळवून देण्यासाठी व्हॅल्यूअशन क्षेत्रातील दिग्गज एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य पातळीवर सरकार दरबारी नोंदणीकृत अशी “गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशन” ही संस्था स्थापन केली आहे.
संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम काळे, तज्ञ मार्गदर्शक आनंद पेडणेकर व भरत ओसवाल, संस्थापक भैय्याभाऊ भामरे, संचालक अनिल वाघाडकर, कार्याध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, उपाध्यक्ष नचिकेत भुर्के व चेतन राजापूरकर, प्रशासकिय सचिव सतिश पितळे, सचिव राजाभाऊ वाईकर, कोषाध्यक्ष दीपक देवरुखकर, सह कोषाध्यक्ष कालीदास कांदळगावकर , संजय वाघ, संतोष भडेकर, समीर शहा प्रयत्नशील आहेत.
असोसिएशन ची सभासद नोंदणी महाराष्ट्रातील जिल्हा तालुक्यातून सुरू आहे आतापर्यंत ६०० च्या वर झालेली आहे.
सोन्याला उपमा नाही
पुरातन काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे. परन्तु आजही भारतीय जनतेचे सोन्याचे वेड काही कमी झालेले नाही. मग तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो वा श्रीमंत, तो सोने खरेदी करतच असतो. काहीजण हौस म्हणून वा काही गुंतवणुकीच्या दृष्टीने. कारण त्याना कल्पना असते की आपल्या अडचणीच्या वेळी हेच सोने कामाला येणार आहे. अडचणीच्या काळात हे सोने बँकेत, पतसंस्था वा इतर नॉन फायनान्शियल संस्थेमध्ये तारण ठेवून तो पैसे उभे करत असतो.
साहजिकच व्हॅल्यूअर सोबत बँकांना पर्यायाने अंतिम ग्राहकाला ह्या सुसूत्रतेचा फायदा मिळणार आहे. आजच्या 21 व्या शतकात सुद्धा मशीन व्हॅल्यूअशन पेक्षा मानवीय व्हॅल्यूअशन सरस व अचूक ठरतंय हे विशेष आहे.सोन्याचा भाव हा ५०,००० च्या वर पोहचला असून त्याच्या वर असलेली जोखमी प्रचंड प्रमाणात वाढली असून आहे. आजपर्यंत सांगली व पुणे येथे आपल्या सभासदांसाठी कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत असे असोसिएशनचे प्रशासकीय सचिव श्री सतिश पितळे म्हणाले.