शबनम न्युज | पुणे
नवरा-बायकोच्या कडाक्याच्या भांडणात ८ वर्षीय मुलीला गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नर्हे,पुणे येथे सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. राजनंदिनी पांडुरंग उभे असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. तसेच याप्रकरणी मुलीचे वडील पांडुरंग तुकाराम उभे (वय :३८ वर्षे, रा. हेरंब हाईट्स, नऱ्हे, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या राजनंदिनीवर खाजगी रुग्णालयावर उपचार सुरु असून तिची प्रकुर्ती स्थिर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास पांडुरंग उभे हे दारू पिऊन घरी आले. त्यामुळे त्यांच्यात आणि त्यांच्या बायकोत भांडण सुरु झाले. या भांडणांतच पांडुरंग यांनी बायकोवर बंदूक उगारली पण ती गोळी त्याच्या ८ वर्षीय मुलीच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली. यात ती गंभीर जखमी झाली. पांडुरंग यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तसेच त्यांच्याकडे परवाना असलेले रिवाल्वर ही आहे. याच रिवाल्वरचा फायदा घेत त्यांनी बायकोवर बंदूक उगारली, पण ती गोळी त्यांच्या मुलीला लागली. सिंहगड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.