शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील विकास नगर किवळे मामुर्डी परिसरातील विविध प्रश्न मार्गी लागावे याकरिता या परिसरातील शिवसेनेचे युवा सेना उपशहर अधिकारी तथा राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब तरस यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन पिंपरी चिंचवड शहरातीलअनेक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदन दिले.
पिंपरी चिंचवड शहरातील उत्तम नगर किवळे गाव या ठिकाणी अनेक नागरिक वास्तव्यास असून या ठिकाणी ड्रेनेज लाईनची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
पिंपरी चिंचवड शहरात जवळील मामुर्डी गाव मधील स्मशानभूमीची जागा हस्तांतरित करून नव्याने बांधण्याबाबत ची मागणी तरस यांनी मनपा आयुक्तकडे केली आहे मामुर्डी गावात दशक्रिया विधीसाठी आरक्षित जागा असून ती जागा मामुर्डी गावाची यांना अद्यावत करून त्याचे समशानभूमी बांधून देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
देहू रोड कँटोन्मेंट बोर्ड शितळा नगर या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत विद्युत वाहिनीचे बांधकाम पूर्ण झालेल्या असून लवकरात लवकर विद्युत वाहिनी मशीन बसवून अंत्यविधी करण्यासाठी खोली करावी.
सांगली ते किवळे मुकाई चौक हा बी आर टी रोड चा प्रकल्प गेले अनेक वर्षापासून सुरू झालेला असून तो वापरात आहे तरी मुकाई चौक पासून ते शिंदे पेट्रोल पंप कडे गेलेला रस्ता अद्यापही महानगरपालिकेने विकसित केलेला नाही त्याचा रस्ता रुंदीकरण करून विकसित करावा
साईनगर फॉरेस्ट च्या बाजूला महानगरपालिके मार्फत मोठे पाण्याची टाकी उभारण्यात आलेली असून अनेक वर्षापासून या पाण्याच्या टाक्या द्वारे साईनगर वासियांना पाणीपुरवठा केला जातो सध्याच्या काळात गेले एक ते दोन वर्षापासून साईनगर बाजूला गहुंजे ग्रामपंचायत हद्दीतील शेकडून नागरिकांनी या पाण्याच्या टाकीच्या मुख्य पाईपलाईन मधून नळ कनेक्शन अनधिकृत पणे चोरून घेतलेले असून त्याचा परिणाम महानगरपालिका हद्दीतील साईनगर या ठिकाणी राहणाऱ्या महानगरपालिकेचे सर्व टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना होत आहे तरी साईनगर मधील सर्व नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून गहुंजे ग्रामपंचायतीतील शेकडो नागरिकांनी चोरून नळ कनेक्शन घेतलेल्या असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
विकास नगर शाळा क्रमांक 95 या ठिकाणी प्राध्यापक शिक्षकांच्या सोबत चर्चा करून अनेक बाबी निदर्शनास आल्या आपणाकडे या पत्रद्वारे यापूर्वीही याबाबत कळविण्यात आले आहे शाळेसाठी प्रशस्त अशी मोठी इमारत त्याचप्रमाणे मुलांना खेळण्यासाठी मैदान सद्यस्थितीत उपलब्ध नसून ते उपलब्ध करून द्यावे
विकास नगर मुखेड रोड हॉटेल ते शिंदे पेट्रोल पंप दरम्यान रस्त्याची सद्यस्थितीची स्थिती पाहता रस्ता रुंदीकरण करून विकसित करण्याची खूप मोठी गरज आहे महानगरपालिकेच्या मार्फत या अगोदर याबाबत पाठपुरावा करण्यात आला असून या संदर्भात सल्लागार नियुक्ती झालेली आहे महापालिकेला व सल्लागार समितीला अनेक वेळा रस्ता रुंदीकरणाबाबतची मागणी करण्यात आली परंतु अद्यापही रस्ता रुंदीकरण झाले नाही विकास नगर मुख्य रोडचे रुंदीकरण करून रोड विकसित करण्यासंदर्भात ज्या नागरिकांच्या अगोदर हरकती होत्या त्या नागरिकांना विश्वासात घेऊन सदरचा रस्ता त्वरित रुंदीकरण करून विकसित करावा
केवळ गाव या ठिकाणाहून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रोडच्या दोन्ही बाजूचे सर्विस रोड बाजूने असलेले डीपी रोड मामुर्डी गहुंजे गावाच्या हद्दीपर्यंत विकसित करण्यात यावे
अशा विविध सामाजिक प्रश्नसंदर्भात राजेंद्र तरस यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले