शबनम न्यूज / पिंपरी
कर व करेत्तर बाबींचे १/४/२०२१ चे परिपत्रकाची मुदतवाढ देत..कर भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी संजय ठाकरे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष छावा क्रांतीवीर सेना यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे केली आहे. निवेदन नमु डंकेल आहे कि महानगरपालिके मार्फत कर भरण्यासाठी फक्त जुन महिन्या पर्यंत सुट देण्यात आली होती.मात्र ती वेळ आणि काळ वाईट होता.गेल्या एक वर्षापासून कोरोना व्यतिरिक्त अनेक संकट म्हणजे हाताला कामे नाही.हाँस्पिटलची बिल, उदरनिर्वाह साठी पोष्टिक अन्न लाईट बिल अशा संकटांचा सामना करत मार्च, एप्रिल,मे महिन्यातील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना जगतो कि मरतोय यांचा भरवसा नसताना पालिकेने दि.०१/०४/२०२१ रोजी दर कर भरण्यासाठी परि पत्रक काढले मात्र या परिपत्रकाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचलेला नाहि.कोरोना लाँकडाऊन च्या जाचक अटि व नियम पाहता पालिकेमध्ये देखिल कर्मचारी, अधिकारी वर्ग उपस्थिती कमी प्रमाणात होती त्याच प्रमाणे नागरिकांना घरा बाहेर पडण्यावर निर्बंध होते.यासर्व गोष्टी लक्षात घेता आपल्या योजनेचा सर्वसामान्यांना पुर्णपणे लाभ घेता आलेला नाही. सदर करा संदर्भातील योजनेचा कालावधी वाढवुन कर भरण्यासाठी सवलत देत २ ते ३ टप्प्याटप्प्याने कर भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी.