शबनम न्यूज / पिंपरी
युवा सेना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आज दिनांक 15.7. 2021 रोजी पिंपरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे केंद्र सरकारच्या पेट्रोल ,डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात एक अनोखा आंदोलन करण्यात आले युवा सेनेच्या वतीने हातगाडीवर मोटर बाईक ठेवून त्याला हार घालून केंद्र सरकारच्या विरोधात अंतयात्रा काढण्यात आली. तसेच पेढे वाटुन दरवाढीचा अनोखा निषेध करण्यात आला.
आंदोलनाला युवा सेनेचे पिंपरी चिंचवड शहर आधिकारी कु. विश्वजीत श्रीरंग बारणे, शहर समन्वयक रुपेश कदम ,शहर चिटणीस अभिजीत गोफण, उपशहर अधिकारी राजेंद्र तरस, विधानसभा अधिकारी माऊली जगताप, निलेश हाके ,युती सेना प्रमुख प्रतिक्षा घुले, पंकज दीक्षित, अक्षय परदेशी, मंदार यळवंडे, करण वाल्हेकर, रोहन शेटे, वतन वाल्हेकर, दिनेश चव्हाण, रवि नगरकर, केदार चासकर, निखिल येवले, राहुल पालांडे, आशिष बाबर,प्रमोद चव्हाण , सागर शिंदे,शरद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.