अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी आबासाहेब शिरसाठ
शबनम न्यूज / नेवासा
नेवासा तालुक्यातील वरखेड गावातील ग्रामपंचायत मिळकत नंबर २७६.वर बेकायदेशीर अतिक्रमण केल्या प्रकरणी. अर्जदार राजेंद्र बाबुराव कसबे, शांताराम धन्नु कुंढारे. कैलास गोपीनाथ कुंढारे. यांनी बेकायदेशीर अतिक्रमण न हाटवल्यास अमरणउपोषण करण्यात येईल असे निवेदन गट विकास अधिकारी नेवासा. यांना देण्यात आले.
सविस्तर माहितीनुसार.गजानन पिल्लेवाड सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवासा
यांना देण्यात आले आत्ताच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुक 2020- 2021 मध्ये वरखेड ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या सदस्या सौ.छाया भास्कर खरे व सौ. शशिकला शांतवन खरे यांचे सरकारी ग्रामपंचायत मिळकत नं.276 वर बेकायदेशीर अतिक्रमण आहे याबाबत अर्जदार राजेंद्र बाबुराव कसबे ,शांताराम धन्नु कुंढारे , कैलास गोपीनाथ कुंढारे विवाद अर्ज मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे सादर केलेला आहे.
यावर खरे कुटुंबातील सदस्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेबाबत वेळोवेळी पंचायत समिती कार्यालयात लेखी स्वरूपात माहिती दिलेली आहे यावर गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी पाखरे साहेब यांना चौकशीचे आदेश दिलेले आसतांना आदेशाला केराची टोपली दाखवली व कामात दिरंगाई केली तरी विस्तार अधिकारी पाखरे साहेब यांची सखोल चौकशीकरुन योग्य ती कारवाई न केल्यास पंचायत समिती नेवासा येथे आमरण उपोषण करण्यात येईल हे श्री कैलास गोपीनाथ कुंढारे यांनी बोलतांना सांगितले यावेळी निवेदन कर्ते राजेंद्र बाबुराव कसबे ,शांताराम धन्नु कुंढारे , कैलास गोपीनाथ कुंढारे हे उपस्थित होते.