शबनम न्यूज : पुणे (दि.१४ डिसेंबर ) :- जन्म घेण्याचा अधिकार, सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार, प्रत्येक माणसाला जन्मापासून मिळालेला आहे. तरी पण या हक्कांचे हनन करण्यात येते. या हक्कांवर गदा येऊ नये, यासाठी सरकार आणि प्रशासनाने लक्ष दिल्यास अधिकार हननाचे प्रमाण कमी होऊ शकते. यासाठी १० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था, जिल्हा विधी प्राधिकरण आणि जाधवर ग्रुप या संस्थांच्या माध्यमातून मानवी हक्काचे कवी संमेलन घेण्यात आले आहे.
पुण्यातील अलका चौकामध्ये नामवंत कवी अनिल दीक्षित ,सुरेश कंक,जेष्ट कवयित्री शोभा जोशी ,उमाकांत आदमाने ,कैलास भैरट ,शरद शेजवळ ,राजेंद्र वाघ ,अरूण कांबळे,सुभाष चव्हाण, राज अहीरराव, तानाजी एकोंडे,मधुश्री,ओव्हाळ,शामराव सरकाळे,शरद शेजवळ, वर्षा बालगोपाल, माधुरी विधाटे, नंदकुमार मुरडे,तानाजी एकोंडे, एकुण 30 पिंपरी चिंचवड मधील कवीं यांच्या विडंबन रचनेतून मानवी हक्कांची जनजागृती केली.
यावेळी “समता- बंधुता – लोकशाही, संविधानात शिवाय पर्याय नाही” “मानवी हक्क आयोगाचा एकच विचार, सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार”, संविधानाचा विचार काय? स्वातंत्र्य -समता- बंधुता- न्याय” अशा घोषणां आण्णा जोगदंड स्पीकरमधून देत होते तर संस्थेचे कार्यकर्ते व कवी हातात फलक घेऊन माहितीपत्रक वाटुन ,रचना सादर करून मानवी हक्काची जनजागृती करत होते, सदर जनजागृती करत असताना शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी कपड्यांवर स्लोगन लिहून त्याचा विशेष पेहराव करून जनजागृती करीत होते.
यावेळी कवी शेजवळ यांनी”उठ मानवा तु जागा हो ना, मानवी हक्काची तु.जाण ठेव ना। हि रचना सादर केली तर.नंदकुमार मुरडे यांनी दिल छोटासा, छोटीशी आशा सर्वानी ऐका जगण्याची भाषा अंतरगातून लिहीण्याची भाषा दिल है छोटासा छोटीसी आशा. हि रचना सादर केली राजेंद्र वाघ यानी अच्छे दिन कधी येणार? चिमुरडी वर बलात्कार, कोवळी मने गुन्हेगार, दिवसा ढवळया लुटमार,अच्छे.दिन कधी येणार? तर माधुरी विधाटे यांनी सारे मिळुनी गर्जू चला, मानवी हक्क मिळवू चला. छळ,भेदभाव, अन्यायाचा,असा, चक्रव्यूह हा भेदु चला।हि रचना सादर केली.तर अरूण कांबळे यांनी शेतकऱ्यांची व्यथा. आपल्या रचनेतून सादर केली ऐक ऐक भारत देशा आमच्या काळजाची हाक कष्ट करूनी शेतकरी आपल्या गावात मागतोय भिक कवी शामराव सरकाळे यांनी वरखडलेल्या पिसाचु नजरा मानवतेला देती हातरा सावपणाचा घालुनी सदरा सभ्यतेच्यापांघरुनी च्यादरा । कवयित्री मुधुश्री ओव्हाळ यांनी खाली मान घालूनी,कुठवर आता वाकायचे भेदभाव सारा धुडकावून, मला माणूस म्हणून जगायचे सांज श्रुंगार करुन,व्रतवैकल्यात नाही अडकायचे, सावित्रीचा धडा गिरवून, मला सन्मानाने रहायचे मला माणूस म्हणून जगायचे। जेष्ट कवयित्री शोभा जोशी यांनी सांगा सांगा मी काय करू ,माझा घरधनी पितोय दारू,दारू पितोनी मलाच मारतो, बाहेर दुसऱ्याचा मार.खातो, सांगा मी प्रंपच कसा मी करु,माझा घरधनी पितोय दारू कवी आनिल दिक्षितने विडंबन रचना सादर केली.
यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, गजानन धाराशिवकर, विकास शहाणे ,यश चव्हाण ,रवी भेंनकी, पल्लवी भेंनकी, मीना करंजावणे,संगिता जोगदंड,अक्षय जगदाळे, अतिश गायकवाड,संजय कांबळे,प्रकाश बोंधाडे, सुरेश वाघमारे,मोनिका जोशी,ग्राहक हक्क संघर्ष समितीचे मिलिंद राजहंस व त्यांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.