शबनम न्युज | पिपरी चिंचवड
आगामी पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी निवडणूक विभागामार्फत प्रभागानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयादी मध्ये दुरूस्त्या आहेत. प्रभाग क्र. ४०, ३३, ३२. ४१ या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदारांच्या नावात तफावत असून त्याला हरकत घेण्याचा कालावधी १५ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. यावेळी मा. नगरसेवक विनोद नढे व संतोष कोकणे उपस्थित होते.
या निवेदनात प्रभाग क्र. ४० मधील मतदारांचे नाव हे शेजारील प्रभाग क्र. ४१ व ३२ मध्ये दुसर्या प्रभागातील यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना निवडणुकीच्या मतदानावेळी आपले नाव प्रभाग यादी मध्ये न सापडल्यास सदरचे मतदार हे मतदानापासून वंचित राहतील. याचा विचार करता प्रारूप मतदार यादीमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करून नवीन दुरुस्त मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यावी.
तसेच प्रभाग क्र. ३२,३३,४०,४१ या प्रभागातील निवडणूक विभागामार्फत प्रभागनुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रभागातील मतदारांच्या नावात तफावत असून त्यास अनुसरून नागरिकांना हरकत घेण्यासाठी १५ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी नाना काटे विनोद नढे व संतोष कोकणे यांनी केली आहे.