शबनम न्युज | पुणे
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघ , वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघ , पर्वती विधानसभा मतदारसंघ, पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील पदाधिकऱ्यांची आढावा बैठक आज नेहरू मेमोरियल हॉल येथे संपन्न झाली.
या सर्व विधानसभा मतदारसंघातील कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांकडून अजित पवार यांनी पक्ष संघटना बांधणीचा आढावा घेतला.गेल्या वर्षभरात राज्यातील सर्वाधिक आंदोलने ही पुणे शहरात झाली असून नागरिकांच्या समस्यांवर वेळोवेळी केंद्र व राज्य सरकारला जागे करण्याचे काम पुणे शहर कार्यकारणी चोखपणे बजावत असल्याबद्दल अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले.
या आढावा बैठकीसाठी शहराध्यक्ष प्रशांतजी जगताप, खासदार सौ.वंदनाताई चव्हाण, आमदार श्री.सुनीलजी टिंगरे,चेतनजी तुपे, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांतजी वरपे,माजी आमदार सौ.कमलनानी ढोले पाटील,जगन्नाथबापू शेवाळे, जयदेवराव गायकवाड, अंकुशआण्णा काकडे, रवींद्रआण्णा माळवदकर, विशाल बाळासाहेब काळभोर (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र, प्रभारी पुणे शहर ज़िल्हा) यांसह सर्व सन्माननीय माजी नगरसेवक , पदाधिकारी,सेलअध्यक्ष व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.