शबनम न्युज | पुणे
‘शरद मोहोळची माणसे आहोत काम बंद करा,’ असे म्हणत माथाडी कामगारांना काम करण्यास प्रतिबंध करत मारहाण केल्याप्रकरणी संबंधित ४ व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकार हा ३ मार्च रोजी फिनिक्स मॉल येथे घडला.
सदर प्रकरणी शुक्रवार दिनांक ०३ रोजी लोकेश विनोद लखन वय 27 राहणार खडकी यांनी वाकडं पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रणजित गायकवाड, संतोष मामा चव्हाण, आलोक भालेराव व 6 ते 7 अज्ञात हल्लेखोर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हा माथाडी कामगार असून मयुरेश्वरा इंटरप्रयजेस यांच्या वतीने फिनिक्स मॉल येथे काम करत असतो. सदर आस्थापनेतील गेट नंबर ६ याठिकाणी सदर फिर्यादी व त्यांचे जोडीदार अनिल कांबळे , प्रवीण पारखी हे स्टोअर मध्ये येणाऱ्या गाड्यांची निगराणी करीत असताना एक पांडऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार गेटवर नोदणी करून बेसमेंट मध्ये आली हा व नंतर तेथून 4 व्यक्ती तोंडाला मास्क लावून 6 ते 7 व्यक्ती गेट मधून सिक्युरिटी कबिन जवळ आले आणि त्यातील एकाने हातातील कोयत्याने टेबलावर मारले आणि नंतर सिक्युरिटी काबिन ची काच फोडली नंतर एका इसमाने आम्ही शरद मोहोळ ची माणसे आहोत आणि येथे शरद मोहोळ माणसे कामे करणार तुम्हाला सांगून सुद्धा काम बंद केले नाही म्हणत समोर उभ्या असलेल्या जेसीबी ची काच दगडाने फोडली सदर प्रकार पाहून कामगार काम सोडून पळून गेले पण तेथे उभ्या असलेल्या अनिल कांबळे व प्रवीण पारखी यांच्या हातावर कोयत्याने वार करून अनिल कांबळे यांच्या खिशातील 10000 रुपये काढून घेतले व शिव्या देत बाहेर निघून दुचाकी वाहने घेऊन हॉटेल सयाजी च्या दिशेने निघून गेले.
जखमी अनिल कांबळे व प्रवीण पारखी यांच्या वर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार चालू आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी प्राथमिक उपचार घेऊन येऊन वाकडं पोलीस स्टेशन मध्ये संबधित प्रकाराबाबत तक्रार दाखल केली आहे.संबंधित प्रकाराबाबत वाकडं पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी वाकडं पोलीस पुढील तपास करीत आहेत.