शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
अभिनेते अजय देवगन यांचा सिंघम हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला होता. त्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सिंघम-2 प्रदर्शित केला. त्यालाही प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांनी जबरदस्त कमाई केली होती. यानंतर आता सिंघमचा तिसरा भाग म्हणजेच ‘सिंघम अगेन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे.
अंगात खाकी वर्दी अन हातात बंदूक घेऊन आणि दुसऱ्या हातात गुंडांचे डोके पकडलेले या फोटोत दीपिका दिसत आहे. दीपिका पादुकोणने तिच्या इंस्टाग्राम वर हे फोटो शेअर केले आहे .फोटो शेअर करत दीपिका ने लिहिले आहे की, ‘भेटा शक्ती शेट्टीला’. सिंघम अगेन मध्ये दीपिका शक्ती शेट्टीची भूमिका साकारणार आहे. या फोटोजला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.