श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव आळंदी येथील विद्यार्थ्यांनी विजिट अंतर्गत भोसरी येथील कंपनीला भेट दिली याप्रसंगी प्राध्यापिका सविता मानके यांनी प्रस्ताविक केले.
यावेळी एस फोर एस कंपनीचे संचालक दानेश तिमशेट्टी यांनी टू व्हीलर, फोर व्हीलर, तसेच अवजड वाहने इत्यादी गाड्यांच्या गिअरचे पॅकिंग, प्लास्टिक कव्हर बनविण्याची प्रक्रिया कशी असते हे मशीनच्या माध्यमातून डेमो द्वारे विद्यार्थ्यांना दाखविले, तसेच प्लास्टिकची निर्मिती कशी केली जाते, त्याबरोबरच पेट्रोलचे शुद्ध व अशुद्ध प्रकार कोणते आहेत त्याचा कोणत्या वाहनांमध्ये वापर केला जातो याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली प्लास्टिकचे प्रकार सांगताना कोणते प्लास्टिक पर्यावरणासाठी घातक असते तसेच कोणत्या प्लास्टिकचे पर्यावरणावर दुष्परिणाम होतात याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना सांगून कंपनीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या मशनरी कशा प्रकारे कार्य करतात या संदर्भात सखोल विवेचन केले.
या उपक्रमांमध्ये प्राध्यापक माणिक कसाब ,प्राध्यापिका दिपाली ताम्हाणे व प्राध्यापिका दिपाली सोनवणे यांच्यासह 35 विद्यार्थी व 34 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर मुरलीधर ढमाले व प्राचार्य डॉक्टर हंसराज थोरात यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. प्राध्यापक दिलीप बारी यांनी एस फोर एस कंपनीचे संचालक व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.