शबनम न्युज | पिंपरी
रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने क्रांतीजोती सावित्रीमाई फुले यांना जयंतीनिमित्त सावित्राबाई फुले स्मारक,पिंपरी या ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या पिंपरी चिंचवड शहराच्या उपाध्यक्ष भाग्यश्री आखाडे व सदस्य वैष्णवी डावरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे प्रदेश महासचिव यांनी जयंतीच्या शुभेच्छा देताना असे मत व्यक्त केले कि आजच्या महिलांनी सावित्रीबाईंचा आदर्श घेऊन शिक्षणाच्या जोरावर मोठ्या मोठ्या पदावर जाऊन केवळ स्वतःपुरता विचार न करता त्या पदाचा वापर या शोषित पीडित समाजासाठी केला पाहिजे तीच खरी सावित्रीमाईला आदरांजली ठरेल.
यावेळी संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे,पश्चिम महाराष्ट्र सचिव समाधान गायकवाड,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अभिषेक चक्रनारायण,उपाध्यक्ष भाग्यश्री आखाडे,सदस्य वैष्णवी डावरे इ.पदाधिकारी उपस्थित होते.