शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ऑनलाईन सभेत वर्ग केलेल्या निधीवर स्थगिती द्यावी, असे मागणीचे निवेदन नगरसेविका मंगलाताई कदम यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना दिले आहे.
हि बातमी पण वाचा - अपना वतन संघटनेच्यावतीने पे अँड पार्कच्या ठरावाची होळी
दिलेल्या निवेदनात नगरसेविका मंगलाताई कदम यांनी म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ऑनलाईन महासभेत अंदाजे ४०० कोटीच्या कामाचा निधी वर्ग करण्याचा डाव सत्ताधारी भाजपने साधला आहे. सत्ताधारी भाजप ने इतर नगरसेवकांच्या प्रभागातील निधी पळविण्यासाठीच हा ऑनलाइन सभेचा खेळ खेळला आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागातील निधी सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात वर्ग करण्याचा खेळ या माध्यमातून झाल्याचे दिसत आहे. अशा पद्धतीने सत्ताधारी भाजप, पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये चुकीचा पायंडा पाडत आहे असे यावरून दिसून येत आहे. निधी फिरवल्याने थेट प्रभागातील कामांवर परिणाम होणार आहे.
ऑनलाइन सभेत बोलण्यासाठी संधी मिळत नाही, उपसूचना कोणी कधी कशी वाचली हे कळत नाही. त्यामुळे आपण त्वरित या सर्व विषयांवर स्थगिती आणावी. असे हि नगरसेविका मंगलाताई कदम यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.