पिंपरी, दि. १ ऑगस्ट २०२१ :- माजी महापौर मधुकरराव पवळे हे कुशल नेतृत्व गुण लाभलेले आदर्श राजकारणी होते असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या .
यावेळेस उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या सुमन पवळे, शैलजा मोरे, अनुराधा गोरखे, माधवी राजापुरे, कमल घोलप, माजी नगरसदस्य शशिकिरण गवळी, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे, डी.पी. खंडाळे, नितीन घोलप, बालाजी गवारे आदी उपस्थित होते