शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
सध्याच्या कोव्हिड-19 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत दि.10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर
2021 या सार्वजनिक गणेशोत्सव काळामध्ये संपन्न होणारा 33 वा पुणे फेस्टिव्हल रद्द करण्यात आला आहे.
प्रथेप्रमाणे पुणे फेस्टिव्हल अंतर्गत श्रींची प्रतिष्ठापना व श्रींचे विसर्जन विधिवत संपन्न होईल.
महापूर, दुष्काळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी पुणे फेस्टिव्हलने दरवेळेस आर्थिक मदतीचा हात पुढे केला
आहे. नुकतेच कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली.
यासाठी मदत म्हणून पुणे फेस्टिव्हलतर्फे सकाळ रिलिफ फंडला दोन लाख रुपयांचा धनादेश सामाजिक कर्तव्याच्या
भावनेतून दिला आहे.
लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात गेला. त्यापासून प्रेरणा घेऊन
कला-संस्कृती, गायन-वादन, नृत्य, संगीत व क्रीडा यांचा मनोहारी संगम असणार्या पुणे फेस्टिव्हलचे आयोजन पुणे
फेस्टिव्हल कमिटी, पुणे नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने केले जाते. पुणे फेस्टिव्हलने पुण्याचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर नेले आहे. सलग 10 दिवस
आणि सातत्याने 31 वर्षे अखंडित चालू असलेला पुणे फेस्टिव्हल हा देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला
जातो.
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले संकट लवकर संपावे अशी श्री गणेशचरणी प्रार्थना करतो आणि पुढील वर्षी नव्या
उत्साहाने, दिमाखदारपणे पुणे फेस्टिव्हल साजरा होईल असा विश्वास व्यक्त करतो.