शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
ग्लोबल बिझिनेस स्कूल अँड रिसर्च सेंटर आणि डीपीयू सेंटर फॉर ऑनलाईन लर्निंगने आज, २४ ऑगस्ट २०२१ रोजी नवीन प्रवेश घेतलेल्या एमबीए विद्यार्थ्यांसाठी विद्यारंभ कार्यक्रमाचे आयोजित केला होता.
कोविड निर्बंधामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला.
मा. डॉ. शशी थरूर, खासदार, भारत सरकारमधील माजी मंत्री – मानवी संसाधन विकास, मा. डॉ. पी. डी. पाटील- कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे, डॉ. एन. जे. पवार- कुलगुरू, डॉ. स्मिता जाधव- विश्वस्त आणि कार्यकारी संचालक, डॉ.चेतन चौधरी- संचालक, जीबीएसआरसी, पुणे, डॉ. सफिआ फारुकी- संचालक, सीओएल तसेच विद्यापीठाचे इतर मान्यवर, सदस्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डीपीयू) यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना आपल्यातील नवीन कल्पना, अनुभव आणि भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी प्रोत्साहित केले. उत्कृष्ट शिक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली. त्यांनी प्राध्यापकांना/विद्यार्थ्यांना अनपेक्षिततेसाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ शशी थरूर (प्रमुख पाहुणे) यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. आपल्या भाषणात, त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांचे इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी सर्व संधींचा उत्तम प्रकारे वापर करण्यासाठी भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी नेहमी संशोधकाच्या भूमिकेतून शिक्षण घेतले पाहिजे.विद्यार्थ्यांनी उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
डॉ.स्मिता जाधव (विश्वस्त आणि कार्यकारी संचालक) यांनी आदरणीय पाहुण्यांचे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना खात्री दिली की विद्यार्थ्यांचा हा नवीन प्रवास त्यांच्या कारकीर्दीत बदल घडवेल आणि त्यांचे भविष्य साध्य होईल. त्यांनी पुढील सत्राबाबत माहिती दिली. दि. २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होत असून या सत्रात प्रमुख पाहुणे मा. श्री देवेंद्र फडणवीसजी- महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते हे विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून संबोधित करतील.
डॉ. चेतन चौधरी (संचालक – ग्लोबल बिझनेस स्कूल अँड रिसर्च सेंटर) यांनी आभार मानले.
Advertisement