संगीताचार्य राधाकृष्ण गरड गुरुजी यांच्या हस्ते महिलांना बॅंकपुस्तिका व पेन्शन मंजुरीपत्राचे वितरण
शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजने अंतर्गत बोपखेल, रामनगर, गाणेशनगर परिसरातील निराधार महिला व अपंग व्यक्तिंना पेन्शन चालु करण्यात आली, त्या संबंधीचे मंजुरी पत्र व बॅकपुस्तीकेचे वितरण आज संगीताचार्य राधाकृष्ण गरज गुरुजी ह्यांच्या हस्ते करण्यात आले, शिवसेना हा पक्ष नेहमीच गोरगरीब लोकांसाठी झपाटुन काम करत आला आहे,समाजातील इतर घटकांची मदत तर सर्वच करतात पण ज्यांना कोण नाही अश्या निराधार लोकांची सेवा करणे हेच मोठे पुण्यकर्म!असे मनोगत गुरुजीनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी दक्षता समिती सदस्य रवि कोवे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण घुले, श्रीकांत घुले (सर), जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष नामदेव गोगावले, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश देवकर,विशेष कार्यकारी अधिकारी भाग्यदेव घुले व इतर मान्यवर उपस्थित होते.
दक्षता समिती सदस्य रवि कोवे (सर) यांचे खुप मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्यामुळे शासकीय योजनेचे काम सुकर झाले,आम्ही इथेच थांबणार नाही, समाजातील तळा-गाळात पोहचुन उर्वरित असलेल्या महिलांनाही शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यावर आमचा भर असेल असे मत पिंपरी विधानसभेच्या युवतीसेना प्रमुख प्रतिक्षा घुले यांनी व्यक्त केले.