शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी | भोसरी
पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप पक्षाचे उद्योग आघाडीचे अध्यक्ष निखिल काळकुटे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले, निखिल काळकुटे यांच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन इंद्रायणी नगर येथे भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी आमदार महेश लांडगे बोलत होते.
यावेळी आमदार महेश लांडगे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की निखिल काळकुटे हे आपल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अथवा सोसायटी धारकांना सोयीसुविधा मिळाव्यात तसेच इतर कामाबाबत सातत्याने धडपड करत असतात परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांच्या सोयीसुविधांसाठी निखिल काळकुटे यांचा पुढाकार असतो, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत चांगली आहे त्यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे असे आमदार महेश लांडगे यांनी निखिल काळकुटे यांच्या कार्याचे कौतुक केले.
या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयामार्फत परिसरातील नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात तसेच परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व या परिसरातील सोसायटी धारकांना मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा पुरविण्यासाठी तसेच या परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी व शासकीय योजनांबाबत सहाय्यता मिळावी याकरिता या जनसंपर्क करण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी नगरसेविका नम्रता लोंढे नगरसेवक, संजय वाबळे सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे यांच्यासह भाजपचे आजी माजी नगरसेवक, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला सदस्य यांच्यासह निखिल काळकुटे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांचे निखिल काळकुटे यांनी आभार व्यक्त केले.