शबनम न्युज | वाकड
स्व.प्रशांत उर्फ पिंटुदादा विनोदे यांच्या वतीने रविंद्र शेठ मोहोळ यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल वाकड गाव शाळा इयत्ता सातवी ग्रुप वाकड व सत्कार समारंभा चा कार्यक्रम संपन्न झाला .
तसेच या प्रसंगी सुनिल शेठ कळमकर यांचा हाडशी गाव उपसरपंच पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वर्गीय प्रशांत उर्फ पिंटुदादा विनोदे प्रतिष्ठान च्या वतीने गड किल्लेसंवर्धनासाठी युवा नेते विक्रम शेठ विनोदे आणि युवा उदोजक राहुल शेठ विनोदे यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.
या वेळी मनोगत व्यक्त करताना वाकडचे युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद म्हणाले कि, जशी स्वर्गीय प्रशांत उर्फ पिंटुदादा विनोदे प्रतिष्ठान च्या वतीने गड किल्ले संवर्धनासाठी आर्थिक मदत केली, तशी इतरांनी देखील असाच पुढाकार घेऊन आर्थिक मदत करावी, असे आवाहन देखील रमजान सय्यद यांनी केले.
यावेळी युवा नेते भावी नगरसेवक विक्रम शेठ विनोदे आणि युवा उद्योजक राहुल शेठ विनोदे आणि स्व.प्रशांत उर्फ पिंटुदादा विनोदे प्रतिष्ठान चे कार्यकर्ते आणि वाकड गाव शाळा इयत्ता सातवी ग्रुप वाकड व आदी मान्यवर उपस्थित होते.