शबनम न्युज | विशेष लेख
गेली दीड वर्षे संपूर्ण विश्व् कोरोना महामारीला झुंज देत आहे. प्रत्येक दिवशी मित्र वा परिजन कोरोना ग्रस्त असल्याची बातमी विचलित करते. सरकार या महामारी पासून सुटका कशी मिळविता येईल यासाठी प्रयत्नशील आहे तरीदेखील लोकांना असहाय वाटू लागले आहे. अशा परिस्थितीत काही लोक निराश होत आहेत तर काही सकारात्मक विचार जोपासून आध्यात्मा कड़े वळत आहे.
फालुन दाफा अभ्यास याकडे कोरोना महामारी पासून सुटका मिळविण्याचा उपाय आहे? फालुन दाफा अभ्यास पद्धतीत अशी मान्यता आहे की महामारीचा उगम तेव्हाच होतो जेव्हा लोकांचे नैतिक आदर्श वा नैतिक मूल्यांचा ऱ्हास होतो आणि समाज भ्रष्ट होतो. महामारी आणि प्राकृतिक आपदा या प्रकृति ची मानवजातीला थेट चेतावणी आणि सामंजस्य निर्माण करण्याचा एक मार्ग होऊ शकतो. असे मानल्या जाते की मनुष्याच्या नैतिक गुणांमध्ये सुधार झाल्यास तो प्राकृतिक आपत्तीपासून प्रभावमुक्त राहू शकतो.
या संदर्भात आम्ही तुमचा परिचय फालुन दाफा (किंवा फालुन गोंग) ह्या आध्यात्मिक साधनेशी करू इच्छितो जी एक मन आणि शरीर यांचा विकास करणारी, एक उच्चस्तरीय साधना प्रणाली आहे. फालुन दाफामध्ये पाच सौम्य आणि प्रभावी व्यायाम शिकवले जातात. परंतु मनाची साधना, किंवा नैतिक गुणांचा विकास करण्यावर मुख्याने भर दिला जातो. हे व्यायाम व्यक्तिच्या उर्जा वाहिन्यांना उघडणे, शरीराचे शुद्धीकरण करणे, तणाव मुक्त करणे तसेच आंतरिक शांतता प्रदान करण्यास मदत करतात. मन आणि शरीराचा एक परिपूर्ण अभ्यास असलेल्या या अभ्यासामुळे लोकांना कमी वेळेतच आश्चर्यकारक स्वास्थ्य लाभ होतात.
फालुन दाफा साधना ही विश्वाची प्रकृती सत्य-करुणा-सहनशीलता या तीन तत्वांवर आधारित आहे, ज्यामुळे याचे अभ्यासी प्रकृती आणि विश्वाच्या तत्वांशी एकरूप होऊ शकतात आणि रोग तसेच आपत्तींपासून प्रभावमुक्त राहू शकतात. अनुभवाच्या अनुषंगाने ते कोरोनाग्रस्त लोक जे अभ्यासी नसून देखील ज्यांनी – “फालुन दाफा चांगलं आहे, सत्य करुणा सहनशीलता चांगलं आहे” या वाक्याचा वारंवार मनात उच्चारण केला ते या गंभीर जीवघेण्या कोरोना पासून मुक्त झाले आहेत. हे अविश्वसनीय वाटू शकते, परंतू या लोकांचे कोरोना मुक्त होण्या मागचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे विश्वाची मुलभूत प्रकृती सोबत एकरूप होणे आहे. आधुनिक विज्ञानाला खरोखर या विषयावर शोध घ्यायला हवा.
अधिकाधिक लोकांनी जर सत्य-करुणा-सहनशीलता या तत्वांना स्वीकारून या तत्वांचं अनुसरण केल्यास सहजच समाजाचा नैतिक स्तर उंचावेल आणि नैसर्गिक आपत्ती कमी होण्यास मदत होईल.पुस्तक “Life and Hope Renewed – The Healing Power of Falun Dafa” मध्ये फालुन दाफा अभ्यासाद्वारे अनेक साधकांचे गंभीर तसेच प्राणघातक आजारांपासून मुक्त झालेले अनुभव संकलित आहे. हे पुस्तक खालील दिलेल्या वेबसाईट वरून डाउनलोड केले जाऊ शकते.
http://en.minghui.org/html/articles/2005/4/3/59184.html
कोरोना काळात बाह्य गतिविधी करणे सीमित असल्यामुळे हा अभ्यास ऑनलाईन शिकविल्या जात आहे. शिकण्यास इच्छुक असल्यास www.learnfalungong.in वर वेबिनार साठी नि:शुल्क रजिस्टर करू शकता. पुस्तकें, व्यायामनिर्देश आणि अधिक माहितीसाठी वेबसाइट www.falundafa.org / www.falundafaindia.org पूर्णपणे नि: शुल्क. संपर्क: 9822569386, 8007606105