शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड कोविड -१९ मुक्त करण्याच्या उद्देशाने बजाज ग्रुप आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने १ लाखांहून अधिक लसी उपलब्ध करून देण्यात आल्या असून पिंपरी चिंचवड शहरात महालसीकरण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Advertisement
या लसीकरण उपक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, ग्रुप हेड सीएसआर, बजाज फिनसर्व अजय साठे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, बजाज ग्रुपचे मिलिंद चौधरी, शुभम मित्तल, लीना राजन आदी उपस्थित होते.
Advertisement