शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उद्याने तसेच हरित पट्ट्याना जोडणारा ‘हरित क्षेत्र जोडणी विकास आराखडा कागदावरच आहे. ‘स्मार्ट ‘सिटी’ अंतर्गत २०३० पर्यंतचा विचार करून शहरातील हरित क्षेत्रे विकसित करण्याची घोषणा करून वर्ष झाले. मात्र अजूनही कागदी घोडे नाचवण्याचे काम सुरू असून प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘हरित सेतू’ उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, परिसरातील हिरव्या विस्तीर्ण पादचारी मार्ग व सायकल मागनिजागांचा यात समावेश करण्याचे नियोजन होते. शहरभरात विखुरलेली सुमारे २८४ उद्याने यात जोडण्यात येणार आहेत. अशा सर्व बाबींचा व्यापक विचार करून हरित क्षेत्र जोडणी विकास आराखडा तयार करण्यात येणार होता. अशाप्रकारच्या उपक्रमाची लावणी करणारे पिपरी चिचवड हे पहिलेच शहर असल्याचा दावा महापालिकेने किला होतायोजनात नागरिकांचा विविध स्तरावर सहभाग साधण्याचे नियोजन महापालिकेने काहीही झाले नसल्याचे आणि बहुतांशी गोष्टी कागदावरच असल्याचे दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आरोग्यदायी वातावरण उपहावे त्याचे पर्यावरणपूरक जीवनमान अधिक उंचवावे महकरुन त्याच्याशी संवाद ठेवून हरित सेतू हा उपक्रम रावण्याची घोषणा महापौर आणि तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी केली होती. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही होताना दिसत नाही.त्यामुळे पर्यावरण संवर्धन आणि हरित पट्टे पादचारी आणि सायकल मार्गाने जोडण्यासाठी हाती घेतलेला हरित सेतू हा उपक्रम मार्गी लावावा, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.