टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आज इंग्लंड विरुद्ध न्युझीलँड चा सामना चांगलाच रंगला. सेमी फायनल सामन्यामध्ये न्युझीलँड संघाने इंग्लंड संघाचा दारुण पराभव केला.
विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इंग्लंड संघाच्या स्वप्नावर अखेर न्यूझीलंड संघाने पाणी फेरले. न्युझीलँड टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाची जबाबदारी पार पाडत इंग्लंडला 165 धावसंख्येवर रोखले. 166 धावसंख्येचे आव्हान घेऊन न्युझीलँड मैदानात उतरले. पहिल्या काही षटकात न्युझीलँड हा सामना हरणार असे दिसत असतानाच न्युझीलँडच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी घनघोर फलंदाजी करत 19 षटकातच 166 धावांचा टप्पा पार करीत अखेर इंग्लंड चा पराभव केला.
आता उद्याच्या होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये जिंकणाऱ्या संघाविरोधात फायनल सामना न्युझीलँड विरुद्ध होणार आहे. जर पाकिस्तान ने ऑस्ट्रेलिया ला हरविले तर न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान असा अखेरचा सामना रंगेल व नक्कीच पाकिस्तान विश्वचषक आपल्या नावावर करेल असे जाणकारांचे म्हणणे आहे कारण यापूर्वी न्युझीलँड संघाला पाकिस्तान ने हरविले आहे आणि जर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरविले तर अखेरचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्युझीलँड असा होणार आहे. हा T20 विश्वचषक अखेर कोण घेऊन जाणार? हे आपल्याला 14 नोव्हेंबर रोजी कळेलच.