शबनम न्युज | मुंबई
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल दिले आहे. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचे निकाल राहुल नार्वेकर यांनी दिले आहे. तर खरा शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय देखील नार्वेकरांनी दिला आहे.
एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, तसेच भरत गोगावले यांनी बजावलेला विभा वैद्य आहे, असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी 2018 मध्ये केलेली घटना दुरुस्ती ही अयोग्य होती, असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले. तसेच निवडणूक आयोगाकडे 1999 मध्ये घटनेत केलेले बदल बरोबर आहेत, त्यामुळे त्या वेळची घटना वैद्य मांडता येईल. पण 2018 मध्ये करण्यात आले बद्दल वैद्य नाही, असं राहुल नार्वेकर म्हंटले. विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही, असं निरीक्षण नोंदवले. हा निर्णय कार्यकारिणीने घ्यायचा असतो, उद्धव ठाकरेंनी असं निर्णय घेणे हे लोकशाहीला घातक असल्याचेही ते म्हणाले.
तसेच सगळ्या पुरावे, साक्षी यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, ही मान्यता देतो, असे देखील राहूल नार्वेकर यांनी म्हटले आहे.