शबनम न्युज | मुंबई
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निकालाचे वाचन सुरू झाले आहे. यावेळी त्यांनी खरी शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचे सांगितले आहे.एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, तसेच भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप हा वैध आहे, असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. तसेच शिवसेनेची 2018 सालची घटना दुरुस्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अवैध असल्याचे म्हटले आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेली 1999 सालची घटना मान्य केली आहे.
ते म्हणाले, शिवसेनेची 2018 ची सुधारित घटना भारतीय निवडणूक आयोगाचे नोंदीमध्ये नसल्याने ती वैद्य मानले जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी इतर कोणत्याही घटनेचा विचार करू शकत नाही. नोंदणी नुसार मी वैद्य संविधान म्हणून शिवसेनेच्या 1999 च्या घटनेवर अवलंबून आहे असं राहुल नार्वेकर म्हणाले.
तसेच खरी शिवसेना ही शिंदे गटाची आहे, असा निकालही यावेळी राहुल नार्वेकर यांनी दिला यानंतर विधान भवनात शिंदे गट कडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. शिवसेना ही एकनाथ शिंदेची खरे शिवसेना आहे असे ते म्हणाले.तसेच शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र असल्याचे निर्णय यावेळी नार्वेकर यांनी दिली आहे.