शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात सध्या हिवाळा व पावसाळा हे दोन ऋतू एकत्र सुरू असल्याचे जाणवत आहे. कालपासून पिंपरी चिंचवड शहरात दुपारच्या वेळी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. कालही दुपारी एक वाजता पावसाला सुरुवात झाली, तशीच सुरुवात पावसाची आजही शहरात झाली सगळीकडे हिवाळ्यात पावसाळा सुरू झाला की काय? असा नागरिकांना प्रश्न पडला आहे.
रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी असते तसेच सकाळ-सकाळी ही थंडीचे प्रमाण जास्त असते. परंतु दुपारी एक नंतर अचानक ढगाळ वातावरणाची निर्मिती होऊन पावसाला सुरुवात होते. हे सलग दोन दिवसापासून पिंपरी चिंचवड करांना अनुभव येत आहे.
त्यामुळेच हिवाळा आणि पावसाळा संगतच अशी म्हणण्याची वेळ पिंपरी चिंचवड करांवर आली आहे.
हवामानात असे बदल होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे थंडी, ताप वाढत असून शहरातील रुग्णालयात रुग्णांचे प्रमाण जास्त होत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.