विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छटपूजेनिमित्त इंद्रायणी नदी तीरावर गंगा आरती
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
Advertisement
आपले कुटूंबाच्या कल्याणासाठी उत्तर भारतीय महिला समर्पण भावनेने सूर्य देवतेची उपासना करीत छटपुजेचे व्रत मनोभावे करतात. बुधवारी विश्व श्रीराम सेना या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी (दि. 10 नोव्हेंबर) सायंकाळी गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार महेश लांडगे, शिवभक्त मिलिंद एकबोटे, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे महाराष्ट्र सदस्य अर्जुन गुप्ता, विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता, छठ पूजा समिती सदस्य, राष्ट्रीय संपर्क प्रमुख प्रमोद गुप्ता, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अरुण टाक तसेच विनोद गुप्ता, रोहित गुप्ता, गोदावरी महाविद्यालयाच्या प्राचार्य कुसुम गुप्ता आणि भक्त भाविक, महिला भगिनी उपस्थित होत्या.
या उत्सवात सुर्यषष्टी महाव्रत महापूजा, छोटकी छट, सूर्यास्तावेळी गंगा आरती निवडक भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाली. स्वागत संस्थेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी केले. आभार प्रमोद गुप्ता यांनी मानले.