शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ डिसेंबर) :-
पिंपरी-चिंचवड शहरात महानगरपालिकेच्या समोरच सहावीला पिंपरी-चिंचवडला आलो. असे फ्लेक्स लागले आहे. हा काय प्रकार? अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. असे चर्चा असणारे फ्लेक्स यापूर्वीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लावले गेले आहे. मागील वर्षी एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसाठी असेच एका फ्लेक्सचे प्रयोग केले होते. त्या फ्लेक्सची ही चर्चा अख्ख्या शहरात झाली होती. परंतु आता सहावीला पिंपरी-चिंचवडला आलो याचा अर्थ काय? आणि हा काय प्रकार? असा प्रश्न पिंपरी-चिंचवड करांमध्ये उपस्थित होत आहे.
कोणीतरी एखाद्या व्यावसायिकाने किंवा एखाद्या व्यक्तीने एखाद्या वस्तूची जाहिरात करण्यासाठी असे फ्लेक्स लावले असतील. परंतु या फ्लेक्सचे गुपित कोणालाही माहीत नसल्याने या फ्लेक्सची चर्चा होत आहे. काही दिवसातच हा काय प्रकार आहे ते कळेल.