शबनम न्यूज : पुणे (दि.१६ डिसेंबर) :- राज्यातील सर्वात जुनी आणि नावाजलेल्या दि पूना मर्चंट चेंबरच्या अध्यक्ष पदाची सूत्रे प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र बाठिया यांनी बुधवारी स्वीकारली. उपाध्यक्षपदी अजित बोरा, सचिवपदी राजकुमार नहार तर सचिवपदी ईश्वर नहार यांची बिनविरोध निवड झाली.
दि पूना मर्चंट च्या नुकत्याच झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत प्रोग्रेसिव पॅनलने बाजी मारली 2021 – 22 कार्यकारिणी सभा बुधवारी झाली. या सभेत नूतन कार्य करण्याची निवड करण्यात आली. या निवडणुकीत प्रोग्रेसिव पॅनलचे ८ तर बाबा पोकरणा पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. व्यापाऱ्यांनी टाकलेल्या विश्वासाच्या पातळीवर आम्ही खरे उतरून व्यापाऱ्यांचॆ प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी सांगितले.
Advertisement