शबनम न्यूज : मुंबई (दि.२९ डिसेंबर) :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णवाढीने अचानक उसळी घेतली असून, मंगळवारी (दि.28 ) रोजी आटोपलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः ट्विट करून हि माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, असे हि यावेळी त्यांनी सांगितले आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती.काळजी घ्या.असे हि यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
Sadanand and I, both of us have tested positive for COVID – 19. We do not have any symptoms. Requesting everyone who has come in contact with us to get themselves tested. Take Care.
Advertisement— Supriya Sule (@supriya_sule) December 29, 2021