शबनम न्यूज : मुंबई (दि.०२ जानेवारी ) :- राज्यात 3 जानेवारीपासून विज्ञान विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्जनशील विचार क्षमता उत्तेजित करण्यासाठी आणि मुलांमध्ये वैज्ञानिक स्वभाव विकसित करण्यासाठी दर सोमवारी विशेष ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
राज्यातील शिक्षकांना सहज उपलब्ध असलेल्या सामग्री मधून विज्ञान विविध प्रयोग प्रतिकृती बनवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवणे आणि वर्गामध्ये उपक्रम करण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने विज्ञान विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे व अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी ऑनलाइन कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील सहावी ते दहावी पर्यंत विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना विज्ञान विषयावरील निवडक संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून व विविध प्रतिकृती वापरून कशा स्पष्ट कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
दिनांक 3 जानेवारी 2022 पासून दर सोमवार इयत्ता सहावी ते आठवीसाठी सामान्य विज्ञान या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दुपारी 3 ते 4 आणि इयत्ता नववी ते दहावी साठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दुपारी 4 ते 5 या वेळेत तज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच सदर ऑनलाइन कार्यशाळेमध्ये उर्वरित शालेय विषयांचे शिक्षक पालक व विद्यार्थी यांना सुद्धा सहभाग घेता येईल. अशी माहिती रमाकांत काठमोरे (सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे -30 ) यांनी दिली आहे.
Make sure you don't miss these.Starting January 3, the @scertmaha,in collaboration with @AgastyaSparks,will undertake special online workshops every Monday to stimulate creative thinking potential & develop scientific temper in children. #learnwithfun #science @MahaDGIPR @vgarad pic.twitter.com/D7WhabhBhk
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) January 2, 2022