शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
काल शनिवार (दि.०५) जय जिजाऊ जय सावित्री फाऊंडेशन च्या माध्यमातून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या ऑनलाइन स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थिती मुळे मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी बोलताना जय जिजाऊ जय सावित्री फाउंडेशन च्या संस्थापिका अॅड.सौ पूजा दिपक भोंडवे या उपस्थितांचे स्वागत करताना म्हणाल्या “स्पर्धेत सहभागी असलेल्या मुलांच्या कलागुणांना पाहून आम्ही अवाक झालो असून आपल्या भागात खूप मोठं टॅलेंट, भविष्यातील खेळाडू, कलाकार घडू शकतात याची जाणीव आम्हाला झाली परंतु त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, सराव करण्यासाठी कोणते ग्राउंड, कला मंडळ नसल्याची खंत वाटतं असून भविष्यात या भागात आधुनिक कलाक्रीडा ग्राम उभारण्याचा प्रयत्न आम्ही करू” पालकांच्या वतीने अनेक जणांनी भोंडवे दांपत्यांचे आभार मानले आणि लहान मुलांना दिलेले हे व्यासपीठ भविष्यातील उत्तम कलाकार, नागरिक घडण्यास उपयोगी पडतील अशी आशा व्यक्त केली.
या कार्यक्रमास शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, दिलीप भोंडवे,बाबासाहेब भोंडवे, मनोहर भोंडवे,भास्कर गोखले, गणेश बोरा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिपक शरद भोंडवे यांनी केले या वेळी बोलतांना ते म्हणाले, आपण आम्हाला ज्या पध्दतीने आमचे आभार मानून शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा आमच्या साठी प्रेरणा ठरतील जय जिजाऊ सावित्री फाउंडेशन च्या माध्यमातून या पुढेही असेच सामाजिक उपक्रम राबविले जातील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. यावेळी स्पर्धेत भाग घेतलेले स्पर्धक आणि त्यांचे पालक, शिवसैनिक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.