शबनम न्यूज ; पिंपरी चिंचवड (दि.१४ फेब्रुवारी) :- मरकळ इंडस्ट्रीज असोसिएशन आणि खंडणी विरोधी पथक, औदयोगिक विभाग, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांची संयुक्त मिटिंग मास फ्लॅज इंडिया प्रा .लि कंपनीच्या ट्रेनिंग हॉल मध्ये संपन्न झाली. धानोरे, सोळु व मरकळ औदयोगिक परिसरातील एकूण वीस कंपन्यांचे एच. आर. प्रमुख उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्तविक किशोर कोंढाळकर, सचिव- मरकळ इंडस्ट्रीज असोसिएशन यांनी केले. अजय जोगदंड – वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी खंडणी विरोधी पथक, औदयोगिक विभाग, याचा परिचय देऊन उद्देश समजून सांगितला आणि त्याचबरोबर प्रत्येक कंपनीत उध्दभवत असलेल्या असामाजिक तत्वाचा आणि विविध प्रकारचा त्रास असल्यास एच.आर. अधिका-यांनी धैयाने सामोरे जाऊन स्थानिक पोलीस स्टेशन किंवा खंडणी विरोधी पथक, यांच्याकडे तक्रार दाखल करावी. त्यासाठी पोलीस विभाग सदैव मदतीला तत्पर असेल याची ग्वाही दिली. किशोर कोंढाळकरानी ग्रामीण भागात कंपनी चालवत असताना येणा-या आडी -अडचणी मांडल्या त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी राजेंद्र कांबळे यांनी आजच्या बैठकीमुळे सर्वाचा आत्मविश्वास उंचवला आहे असे सांगून उपस्थितांचे व पोलीस अधिका-याचे आभार मानले.
मरकळ इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे पोलीस अधिका-याचा विठ्ठलाची मूर्ती व झाडाची रोपे देऊन सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमाला डायनाएक्सल इंजिनीरिंग, इलेकट्रा, वॉलमेंट टेकनॉलॉजी, क्लोराईड मेटल, मास फ्लॅज इंडिया, कैलाश वाहन, हिंदुस्थान प्रेसिंग, वसन इंजिनीरिंग, मॊज्ज इंजिनीरिंग, क्यू टॉर्क, सोहन स्टील, मानसी प्रेसिंग, सील्क इंटरनॅशनल, इंद्रायणी फेरोकॅस्ट, इंप्रो, क्लीनएज प्रॉडक्ट, रविन केबल्स, रिशी लेजर आणि ग्रोवेल इंडिया यांचे एच. आर प्रमुख उपस्थित होते.