शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०१ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी या भागात पथारी व्यावसायिक, भाजी विक्रेते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जागा मिळेल तेथे व्यवसाय करत आहेत, त्यांना व्यवसाय करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामध्ये अतिक्रमण कारवाईलाही बरेचवेळा सामोरे जावे लागते. याच गोष्टीची दखल घेत, सुषमाताई अजित शेलार अध्यक्ष-भारतीय कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा शिवसेना विभागीय कार्यालय दापोडी , यांनी दापोडी प्रभाग क्र.३० मध्ये महानगरपालिके मार्फत भाजी मार्केट साठी योग्य ती जागा व स्टॉल मिळण्याबाबत दि .०८ / ०३ / २०२२ रोजी निवेदन देऊन मागणी केली होती.
सुषमा शेलार यांच्या निवेदनाची दखल घेऊन प्रभाग क्र. ३० दापोडी येथील सिद्धी टॉवर्स समोरील शितळादेवी चौक , दापोडी या ठिकाणी महानगरपालिके मार्फत भाजी मार्केटसाठी जागा मिळण्याबाबत मार्ग मोकळा झाला आहे.
सुषमा शेलार यांच्या मागणी केलेल्या ठिकाणी प्रभाग फेरीवाला उपसमिती मार्फत हॉकर्स झोन निश्चित करणेत आले असून सध्या स्थितीत स्थापत्य ह क्षेत्रिय कार्यालयामार्फत २० मी.डी.पी. रस्ता क्रॉक्रीटीकरण करणेचे काम सुरु असल्याने ते कामकाज पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी हॉकर्स झोन करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे क्षेत्रीय अधिकारी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका कासारवाड़ी यांनी कळविले आहे.