शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ एप्रिल) :- आंबेडकर नगर लुंबिनी बुध्द विहार येथे नवीन विहारात भगवान गौतम बुद्धांची नवीन मुर्ती व महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवीन मूर्तीचे स्थापना ही प्रा.दि.वा बाग़ुल सर तसेच नगरसेविका सौ.वैशालीताई काळभोर व विशाल बाळासाहेब काळभोर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती मा.दिलीपभाऊ दातीर पाटील, मा.जलिंदरशेठ काळभोर, मा.विजयभाऊ धेंडे, सौ.गंगाताई धेंडे, मा.दत्ताभाऊ देवतरासे, मा.राहुल उर्फ़ चिंटूभाऊ दातीर पाटील, मा.सचिन सकाटे, मा.अमोल शिर्के, मा.विशाल सजगने, मा.अतुल चव्हाण, मा.सचिन मोकाशी, मा.विकास ठाणांबीर, मा.निखिल पवार, मा.दीपक महाराणा, मा.कुणाल देशमुख, मा.अभय भोसले तसेच कार्यक्रमास प्रमुख पदाधिकारी, महिला भगिनी व युवा मित्र मोठया संखेत उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर नगर लुंबिनी बुध्द विहार ट्रष्ट यांनी केले होते. यावेळी विशाल बाळासाहेब काळभोर यांनी जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.