शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
हिंदुह्दय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त दापोडी शिवसेना शाखेच्या वतीने दापोडी परिसरात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरात डोळे तपासणी, रक्तगट तपासणी, मधुमेह अशा अनेक प्रकारच्या आजारांची तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
Advertisement
या आरोग्य शिबिरास यशस्वी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुख तुषार नवले , सुनील ओव्हाळ, युवती सेना पिंपरी-चिंचवड शहराच्या सुषमाताई शेलार, विभाग प्रमुख कोमल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. या आरोग्य शिबिरास सर्व शिवसैनिक, दापोडी परिसरातील सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती यांनी सहभाग घेऊन या शिबिराचा लाभ घेतला.
Advertisement