शबनम न्युज | ठाणे
विश्व हिंदू परिषद-ठाणे जिल्हा, अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान-कल्याण, वर्ल्ड व्हिजन.मुंबई,
अम्बिका योगाश्रम -ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डाॅ.मधुसूदन घाणेकर गौरव समिती ऑक्टोबर 2021 मधे
स्थापन करण्यात आली.
या गौरव समिती.तर्फे नुकतीच , विश्वजोडो अभियानचे संस्थापक-अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना ठाणे जिल्हा विश्व हिंदू
परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प.एकनाथ महाराज सदगीर यांच्या शुभहस्ते ‘विश्व महात्मा ‘ ही सर्वोच्च उपाधि नुकतीच ऑनलाईन प्रदान करण्यात आली. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना मिळालेल्या ,जागतिक पातळीवरील सर्वोच्च उपाधिबद्दल समर्पण संस्थेच्या सचिव सौ.प्रतिमा अरुण काळे आणि कार्याध्यक्ष प्रवीण शेटे यांनी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे .
अध्यक्षस्थानी अम्बिका योगाश्रमचे संस्थापक सदस्य बाबासाहेब कोठावळे होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वर्ल्ड व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.नागेश हुलावळे.सर यांनी केले.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी भारतासह न्यूझीलंड, नेपाळ,चीन,रशिया,सिंगापूर, मलेशिया,दुबई, माॅरिशस, श्रीलंका,
भूतान आदि विविध देशातून विश्वजोडो अभियान स्वखर्चाने राबवले.मानवधर्म श्रेष्ठ धर्म, नेत्रदान-अवयवदान-पर्यावरण प्रसार, वंचित दिव्यांग गरीबांना सहकार्य करा, प्राणिमात्रांविषयी भूतदया दाखवा, हसा आणि जग जिंका , निसर्गावर-सा-या विश्वावर प्रेम करा हा संदेश देत जिथे रसिक तिथे कार्यक्रम हे धोरण ठेवून सर्वत्र ‘सबकुछ मधुसूदन ‘चे विनामूल्य कार्यक्रम करीत तमाम पर्यटकांचे मनोरंजन करत विश्व जोडो अभियान करत एकप्रकारे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी पसायदानाचाच प्रसारक केला आहे.हे कार्य त्यांनी अविरतपणे चालू ठेवले आहे. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे अखंड विश्व जोडो अभियान हे सा-या विश्वालाच उच्च आदर्शवाद.दर्शक आहे.असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब कोठावळे यांनी काढले.याप्रसंगी ह.भ.प.एकनाथ महाराज, डाॅ.योगेश जोशी,ॲडव्होकेट आणि नोटरी ज्योती लिमये, महिला.ज्योतिर्विदच्या माजी अध्यक्ष आणि विश्व विख्यात टॅरोतज्ञ ॲड.सुनीता पागे, डाॅ.योगेश जोशी आदि मान्यवरांचीही गौरवपर भाषणे झाली.
” माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा विश्वमहात्मा उपाधीने केलेला सन्मान मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक, आनंदाने स्विकारत आहे. सत्कार्यमग्नता हेचि जीवन हा उच्च आदर्शवादी संस्कार घडवणारा दत्तसंप्रदाय,माझ्या ताथवडे गावचा वारकरी संप्रदाय, सर्व आदर्शवादी संस्था यांचाच हा सन्मान आहे हे मी समजतो.हा सन्मान मी माझ्या मातोश्रीस समर्पित करत आहे. ज्ञानेश्वर माऊलीचा पसायदानाचा विश्वकल्याणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, कुठल्याही जीविताच्या डोक्यात अश्रू राहणार नाही- कुठलीही वेदना.यातना अस्तित्वात राहणार नाही…यासाठी काही अंशी तरी कार्य करण्याचे भाग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.गौरव समितीचा मी अत्यंत ऋणी आहे.” असे विश्व.महात्मा डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सन्मानार्थ उत्तर देताना आपल्या सद्भावना व्यक्त केल्या.
या सोहळ्याच्या उत्तरार्धात डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी.अनियतकालिकाच्या 300व्या विश्वविक्रमी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डाॅ.घाणेकर यांच्या शुभहस्ते साहित्य.संवर्धन कार्यासाठी योगदान देणा-या काही मान्यवरांना ‘आंतरराष्ट्रीय डहाळी त्रिशताब्दी पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आले.