पिंपरी चिंचवड
चित्रपट अभिनेत्री केतकी चितळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल वादग्रस्त पोस्ट केली या पोस्ट नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकी चितळे यांच्या पोस्ट नंतर पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट यांनी केतकी चितळे यांचा निषेध केला असून त्यांनी आपल्या याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल वाईट बोलले म्हणजे प्रसिद्धी मिळते अशा विचारातून वारंवार त्यांच्यावर टीका केली जाते. मनाला वाटेल ते बोलले जाते.मात्र ते अभेद्य सह्याद्रीच्या कड्याप्रमाणे स्तब्ध आणि निश्चयी असतात. त्यांच्यावर टीका करणाऱ्या ‘प्रवृत्ती ‘ गेल्या अनेक काळापासून आपण पाहत आलो आहोत. अशा प्रवृत्तींना नाकारणे हाच त्यांना धडा असू शकतो. ‘चितळे ‘ हा मुद्दा नाही.. मात्र केतकी चितळे व्यक्ती म्हणून ज्या विचारसरणीला समर्थन करतात तो प्रॉब्लेम आहे. हिंसा, सामाजिक तेढ, एखाद्याच्या शारीरिक वेदना यात आनंद मानणारी हि विचारसरणी आहे. संघटित जनमताने त्याचा कडाडून विरोध, त्या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींना समाजात प्रतिष्ठा नाकारणे आणि राजकीय दृष्ट्या त्या विचारसरणीचा पराभव हा यावर एकमेव उपाय आहे.