अभिनेत्री केतकी चितळे विरोधात शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई-
आपल्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टसाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केतकी चितळेविरोधात शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केल्यावरुन केतकी चितळेला ट्रोलही केलं जात होतं. फेसबुकवर अभिनेत्री केतकी चितळे हीनं शरद पवारांच्या आजाराचा संदर्भ घेऊन टीका केली होती.
सोशल मीडियातील पोस्टमुळे केतकी यापूर्वी अनेकदा ट्रोलही झाली आहे. त्याच दरम्यान आता पुन्हा एकदा केतकी चितळे चर्चेत आली आहे आणि ती म्हणजे तिने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे, केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे