शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी पदवीधर संघाचे कार्याध्यक्ष युनूस बाबू शेख यांचे हृदय विकाराने नुकतेच निधन झाले. पुणे पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत त्यांनी जोमाने काम केले होते. राष्ट्रवादी व्यवस्थापन समितीद्वारे युनूस हे कायम पक्ष्याच्या कामात सक्रिय असायचे. सतत हसत आणि सर्वांना मदत करण्याची त्यांची भूमिका असायची.अशा कार्यकर्त्याच्या कुटुंबासोबत आपण उभे राहिले पाहिजे असे माधव पाटील यांनी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे आणि माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांना बोलून दाखवले. दोघांनीही याला होकार दिला आणि दोन दिवसांमध्ये युनूस यांच्या कुटुंबासाठी एक लाख एकोणीस हजाराची मदत उभी राहिली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काल पद वाटप कार्यक्रमासाठी चिंचवडमध्ये आले होते. अजित दादांच्या हस्ते ही मदत युनूस शेख यांच्या वडिलांना शहर राष्ट्रवादी मार्फत सुपूर्त करण्यात आली. कार्यकर्त्याच्या कुटुंबाला आधार म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फुल ना फुलाची पाकळी म्हणून गोळा केलेली मदत नक्कीच अनमोल आहे असे अनेक मान्यवरांनी सांगितले. यासाठी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष फझल शेख , व्यवस्थापन समिती अध्यक्ष शकरुल्ला पठाण , पदवीधारचे शहराध्यक्ष माधव पाटील यांनी पुढाकार घेतला.
यासाठी खालील मान्यवरांनी मदत केली.
अजितभाऊ गव्हाणे – २५००० रु. , संजोगभाऊ वाघेरे पाटील – २५००० रु.
फहमिदा जावेद शेख – १०००० रु. ,विशाल वाकडकर -१०००० रु.
शकरुल्ला पठाण – ७५०० रु. माधव पाटील – ७५०० रु.
विशाल काळभोर – ७५०० रु. ,मयूर कलाटे – ५००० रु.
राहुल भोसले – ५००० रु. इम्रान शेख – ५००० रु.
फझल भाई शेख आणि मित्र परिवार – ५००० रु.,
कविता आल्हाट , कविता खराडे , संगीत कोकणे , उज्वला ढोरे , ज्योती तापकीर , रमा ओव्हाळ, वंदना पेडणेकर, धीरज आंब्रे प्रत्येकी ५०० रुपये ,
अकबर मुल्ला – १००० रु.,इखलास सय्यद – १००० रु.
ऋषिकेश आचार्य-१००० रु.,जगमित सिंग – १००० रु.
किशोर निकम १००० रु.अभिजित घोलप – ५०० रु मदत केली.