पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी येथील मा. नगरसेवक संदीप वाघेरे व जेष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरीतील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत अक्युप्रेशर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, जेष्ठ नागरिक संस्था यांची त्रेवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून संस्थेच्या अध्यक्षपदी श्री.दुंडय्या स्वामी कार्याध्यक्षपदी सुधाकर यादव,सचिव अशोक कुदळे तसेच उपाध्यक्ष पदी भूपाल किबिले यांची निवड करण्यात आली होती. या निवड प्रक्रियेचे औचित्य साधून माजी नगरसेवक संदीप वाघेरे व जेष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने जेष्ठ नागरिक संस्था सभागृह येथे मोफत अक्युप्रेशर आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक ८ जून ते १४ जून या दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. सदर आरोग्य शिबिरासाठी हेल्थ वॅल्यु निसर्गोपचार व अक्युप्रेशरचे डॉ.कमलाकर खुडे,डॉ. राहुल वाघमारे याचे सहकार्य लाभले.