शबनम न्युज | पिंपरी
श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या मध्ये श्री राहुल पंढरीनाथ पारगे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्षपदी श्री निलेश राजाराम राक्षे व विकास दशरथ कंद सचिव पदी श्री अतुल चंद्रकांत राऊत व खजिनदारपदी श्री कौस्तुभ बबनराव भेगडे यांची निवड करण्यात आली.तसेच नगरसेवक श्री संतोष भेगडे श्री शरद भोंगाडे श्री अंकुश आंबेकर यांची संचालक पदी आशिष विलास खांडगे¸ सौ संध्या आकाश देसाई¸ सौ मेघा संदीप भेगडे¸यांची संचालक पदी तर समीर भेगडे¸ वैभव भेगडे¸विजय भेगडे¸ अभिषेक मराठे¸ प्रवीण मुऱ्हे¸ दत्तात्रय भेगडे¸ अमित भसे¸ अरविंद गद्रे¸ राकेश खळदे¸ दिनकर भेगडे¸ यांची निमंत्रित संचालक म्हणून तर डॉ शाळीग्राम भंडारी¸ महेशभाई शहा¸ विलासराव भेगडे¸ चंद्रजीत वाघमारे व संजय ओसवाल यांची सल्लागार पदी निवड करण्यात आली.
निवडणूक कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक श्री संतोष भेगडे यांनी करीत असताना संस्थेची आर्थिक स्थिती मांडत असताना या वर्षी संस्थेने २५ कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला या वर्षी ६२ कोटीची आर्थिक उलाढाल केली आहे असे सूचित केले आलेल्या सर्व नवीन संचालक मंडळाने संस्था या प्रमाणे पुढे नेण्यास सहकार्य करावे असे सूचित केले .
सर्व संचालकांनी संस्थेची आर्थिक बाजू सक्षम करण्याकरिता संस्थेतील ठेवी वाढविण्यास व सुयोग्य कर्ज वाटप करण्याकरिता संस्थेत सक्रिय होऊन काम करण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक श्री बबनराव भेगडे यांनी केले.कार्यक्रमात शरद भोंगाडे यांनी सर्वांचे स्वागत केले सूत्र संचालन श्री सतीश भेगडे यांनी केले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री व्ही पी कोतकर यांनी कामकाज पहिले. विकास कंद यांनी आभार मानले.