शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील तापकीर चौक ते पवार नगर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून इको-फ्रेंडली पद्धतीने रस्ता सुशोभिकरण करा, अशी मागणी माजी नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने तापकीर नगर ते पवार नगर दरम्यान, अत्यंत नियोजनबद्ध २४ मी. रस्ता विकसित केला असून, सदर रस्ता इकोफ्रेंडली पद्धतीने सुशोभित केल्यास आपल्या थेरगावच्या सौंदर्यात भर पडेल. त्यामुळे सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून इकोफ्रेंडली पद्धतीने सुशोभिकरण करण्यात यावे, व तसे आदेश संबंधितांना देण्यात यावे, असेही सदर निवेदनात मनीषा पवार यांनी नमूद केले आहे.
Advertisement